Congress : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना ; नाना पटोले-बाळासाहेब थोरात वाद मिटला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole and balasaheb thorat

Congress : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना ; नाना पटोले-बाळासाहेब थोरात वाद मिटला!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर या दोघांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा देखील दिला होता. दरम्यान थोरात आणि पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत नाराजींच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. 

नाना पटोले म्हणाले, भाजपकडून देशाची बदनामी करण्याचं काम होत आहे. शिंदे-भाजप सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग होत आहे. मात्र आता हुकुमशाही सहन होणार नाही. काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. काँंग्रेस एकसंघ आहे. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने हे वातावरण निर्माण केले होते.

बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगतिले होते की आमच्यात वाद नाही. भाजपचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरल्याचे पटोले म्हणाले. 

पटोले म्हणाले, बाळासाहेब यांनी कोणताही राजीनामा किंवा हायकमांडला पत्र पाठवले नव्हते. माध्यमांनी त्यांच्या भावना दुखवण्याचे काम केले.