टँकरची संख्या घटली; राज्यात जूनमध्ये गेल्यार्षी आठ हजार टँकर होते यंदा..

In June this year 473 tankers started supplying water to the state
In June this year 473 tankers started supplying water to the state

सोलापूर : राज्यात चार वर्षाच्या तुलनेत यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात तब्बल सात हजार ९४ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. सरकारच्या आकडेवारीनुसार ३६ जिल्ह्यातील पाच हजार ६०७ गावे व ११ हजार ८७५ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई होती. यंदा मात्र ही संख्या कमी झाली असून फक्त ४७३ टँकर सुरु आहेत.
महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे सलग चार वर्ष दुष्काळजन्य परस्थिती होती. पाऊस वेळेवर न पडल्याने व पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने भूजलपातळीत हवी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अनेक भागात पाणी टंचाई जाणवत होती. २०१८ आणि २०१९ मध्येही राज्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. गेल्यावर्षी जून, जुलैमध्ये पाऊस पडला नव्हता. त्यामुळे टँकरची संख्या वाढली होती. मात्र सप्टेंबरनंतर अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील सोडून इतरवेळी पडलेल्या पावसाची नोंदी सरकारकडे अवकाळी म्हणून होते. तसाच पाऊस राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून पुढे पडला. त्याने नद्या, ओडे नाले याला मोठ्याप्रमाणात पाणी आले. काही भागात तर पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बऱ्यापैकी विहीर, बोअरच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे उन्हाळ्यातही राज्यात अपवाद वगळता सर्व गावात पाणी होते. ज्या गावात पाणीटंचाई जाणवत होती. तिथे सरकारकडून बोअर किंवा विहीरी अधिग्रहण केल्या. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे टँकरच्या संख्येत घट झाली. 
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण जसे कारण मानले जात आहे. तसेच यावर्षी मार्चपासून राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भव सुरु झाला. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मार्च व एफ्रिलमध्ये अनेक शेतऱ्यांच्या कलिंगड, खरबूजसह इतर पिकांचे नुकसान झाले. जिल्हाबंदी असल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे पुढे शेतकऱ्यांनी पाण्याची पिके घेतली नाहीत. तसाच परिणाम उद्योगधंदे बंद असल्यानेही पाणी पातळीत झाला, अशी कारणे सांगितले जात आहेत. यावर्षी २२ जूनपर्यंत ५८८ गावे व ११७३ वाड्यांवर ४७३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.  टँकरची ही संख्या चार वर्षाच्या तुलनेत कमी आहे. २०१९ मध्ये ७०९४ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. तर २०१८ मध्ये ही संख्या १७३३ होती. २०१७ मध्ये टँकरची संख्या ९३९ होती. 
यावर्षी २२ जूनपर्यंत नागपूर विभागात फक्त २५ गावात ३२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. वर्धा, गोंदीया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात एकाही टँकर सुरु नाही. अमरावती भागात ५९ गावात ६१ टँकर सुरु आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यात एका गावात पाणी टंचाई असून एकही टॅकंर सुरु नाही. औरंगाबाद विभागात ९८ गावे व ७५ वाड्यावस्त्यांमध्ये १४२ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात एकही टँकर सुरु नाही. पुणे विभागात ५७ गावे व २३७ वाड्यांवर ५९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर नसून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. नाशिक विभागात १४५ गावे व ३२५ वाड्यांवर १२५ वाड्यांवर १२० टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जळगाव व धुळे जिल्ह्या एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. ठाणे विभागात २०४ गावे व ५३६ वाड्यांवर ५९ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाही गावात टँकर सुरु नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com