विद्यार्थी हस्ताक्षर सुधारणेचा जुन्नर पॅटर्न

विद्यार्थी हस्ताक्षर सुधारणेचा जुन्नर पॅटर्न

जुन्नर - शालेय जीवनापासून चांगले व सुंदर हस्ताक्षर काढण्याची सवय लागावी यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना शिक्षक व विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे आज तालुक्‍यातील अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

हस्ताक्षर सुधारण्याबरोबरच वाचन, लेखन, पाढे पाठांतर, इंग्रजी स्पेलिंग या मूलभूत शैक्षणिक बाबीवर भर दिल्याने शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली. तसेच शाळेतील मुलांच्या उपस्थितीचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अक्षर चांगले येत असल्याने मुले लिखाणाचा कंटाळा करत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी सांगितले.

शिवजयंती उत्सवासाठी येथे आलेले जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी व अधिकारी प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर पाहून भारावून गेले. यावेळी मुलांच्या हस्ताक्षर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मेमाणे यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास हा उपक्रम फायद्याचा ठरेल, असा पांडुरंग मेमाणे यांनी व्यक्त केला. प्रत्येक केंद्रातील उत्कृष्ट हस्ताक्षर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अक्षरांचे फ्लेक्‍स बोर्ड तयार करून शिवजयंती निमित्ताने दोन दिवस पंचायत समिती आवारात लावण्यात आले होते. हस्ताक्षर प्रदर्शनाचा हा प्रयोग चांगला असल्याची भावना या वेळी शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेत कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यातील दुसरी व तिसरीच्या ८० हजार विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला होता. आता जुन्नरला संपूर्ण तालुक्‍यासाठी हा राबविला आहे. हा जिल्ह्यातील शाळांसाठी जुन्नर पॅटर्न म्हणून मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे.
- पांडुरंग मेमाणे, गटशिक्षणाधिकारी, जुन्नर तालुका

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com