कडकनाथप्रकरणी पाटणमध्ये गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी इस्लामपूर येथील रयत ॲग्रो इंडिया व महारयत ॲग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांच्या विरोधात आज पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला.

पाटण - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी इस्लामपूर येथील रयत ॲग्रो इंडिया व महारयत ॲग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांच्या विरोधात आज पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला. या प्रकरणी सचिन शिर्के (रा. नेरळे, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे. 

हा राजकीय डाव - खोत
या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कसून चौकशी करण्याची मागणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही माझी भावना आहे. असे कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadakanath crime case filed in Patan