
Kamaltai Gawai issues press release clarifying she will not attend RSS Vijayadashami event, reiterating lifelong commitment to Ambedkari movement.
Summary
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवईंना आरएसएसच्या अमरावती विजयादशमी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते.
त्या कार्यक्रमाला त्या जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
कमलताई गवईंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कार्यक्रमाला जाणार की नाही हे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५ ऑक्टोबरला अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमा त्या जाणार असल्याची चर्चा होती पण आता यावर खुद्द कमलताई गवई यांनीच भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलताईंनी स्पष्ट केले आहे.