आर. के. स्टुडिओ विकण्याचा कपूर कुटुंबीयांचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुंबई : चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ कपूर कुटुंबीयांनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुले रणधीर, ऋषी, राजीव आणि मुलगी रितू नंदा, रिमा जैन यांनी एकत्रितपणे हा मोठा निर्णय घेतला आहे. 

जवळपास सत्तर वर्षांपूर्वी राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओची स्थापना केली होती. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना याविषयी माहिती दिली. "आर. के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहित असलेल्या वस्तूंचे नुकसान झाले. त्यामुळेच स्टुडिओ विकण्याचा कठीण निर्णय आम्हाला घ्यावा लागला. काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे,'' असे ऋषी कपूर यांनी सांगितले आहे. 1988 मध्ये राज कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर या स्टुडिओची धुरा कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली होती. ही वास्तू आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. 

पांढरा हत्ती! 
स्टुडिओच्या देखभालीसाठी मोठा खर्च होत होता. हा पांढरा हत्ती सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. तसेच आम्हा भावंडांप्रमाणेच आमची मुले आणि नातवंडे एकत्र राहतील, याबाबत खात्री देता येत नाही, असे कपूर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Kapoor family decide to sell RK studio