

Karale Master announces plans to contest the 2029 Maharashtra Assembly Election following the Nagpur Graduate Constituency election results and discusses his future political strategy
esakal
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत कराळे मास्तरांच्या भूमिकेची राज्यभर चर्चा झाली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कराळे मास्तरांनी मिळवलेल्या मतांमुळे त्यांच्याकडे किंगमेकर म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीनंतर त्यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली असून, २०२९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. तसेच, आतापासूनच बूथ पातळीवर तयारी सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.