esakal | भाजपकडून आंबोट गावामध्ये कोविड लसीकरण शिबिर | Corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

भाजपकडून आंबोट गावामध्ये कोविड लसीकरण शिबिर

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नेरळ : कर्जत (Karjat) तालुक्यातील आंबोट गावामध्ये (Ambot village) तेथील भारतीय जनता पक्षाचे (BJP) वतीने लसीकरण शिबिराचे (vaccination drive) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 150 ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. भाजप आंबोट शाखेच्या माध्यमातून कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: राज्याच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार अन्‌ खांदेपालट

त्यावेळी कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने कोविशील्ड लसीचे लसीकरण 150 ग्रामस्थांनी करून घेतले. लसीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी आंबोट येथील भाजपचे कार्यकर्ते मिनेश मसने,राहुल मसने,निमेश मसने,प्रसाद मसने,समाधान मसने,सागर मसने तसेच वैभव मसने,कैलाश मसने,विशाल मसने, प्रकाश मसने,प्रशांत मसने,सोपान मसने प्रथमेश मसने आणि देविदास मसने या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना लसीकरण साठी प्रवृत्त केले.या शिबिराला भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे,तसेच भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे,यांनी शिबिराला भेट देऊन कौतुक केले.

loading image
go to top