कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर वन बनेल - संजय राऊत

पीटीआय
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल, असा विश्‍वास आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपने कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील यंत्रणा कामाला लावल्याचाही आरोप त्यांनी केला. राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती झाली म्हणजे २०१९ च्या लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीतही युती होईल, असे गृहीत धरणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राऊत म्हणाले, की देशात ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुका होतात, तेथे केंद्राची सर्व यंत्रणा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात कामाला लागतात. अशा स्थितीत देशातील आणि राज्यातील प्रशासन वाऱ्यावर सोडले जाते. हे चित्र देशातील प्रत्येक जण पाहत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, की उत्तर प्रदेशात धूळवादळाचे संकट आलेले असताना आदित्यनाथ कर्नाटकच्या प्रचारात होते. 

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळेल आणि पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना

Web Title: Karnataka Congress Sanjay Raut Politics