Kartiki Ekadashi Yatra : रांग थांबविल्याने भाविकांना २३ तासानंतर दर्शन

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या लाखो भाविकांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषामुळे अवघी पंढरी भक्तिमय झाली.
Kartiki Ekadashi pandharpur
Kartiki Ekadashi pandharpursakal

पंढरपूर - कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या लाखो भाविकांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषामुळे अवघी पंढरी भक्तिमय झाली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज दहाव्या क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. रात्री दोनच्या सुमारास शासकीय महापूजेसाठी पदस्पर्श दर्शन रांग थांबविल्यामुळे रांगेत उभारलेल्या भाविकांना तब्बल २२ ते २३ तासानंतर दर्शन झाले.

आषाढी एकादशी दिवशी सावळ्या विठुरायाचे दर्शन घडावे यासाठी आदल्या दिवशीपासून लाखो वारकरी दर्शन रांगेत जाऊन उभारतात. अशा भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज २२ ते २४ तास रांगेत थांबावे लागत होते. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या निमित्ताने पदस्पर्श दर्शन रांग थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री मंदिरातून बाहेर पडल्यावर रांग सुरू करण्यात आली.

त्यामुळे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना आज सकाळी तब्बल २२ ते २४ तासानंतर आज दर्शन झाले. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले आशुबा किसनराव बोत्रे (रा. कोटाळा ता. सोनखेड जिल्हा परभणी) म्हणाले, बुधवारी सकाळी अकरा वाजता दहाव्या क्रमांकाच्या पत्राशेडमध्ये जाऊन दर्शन रांगेत उभारलो होतो. आज गुरुवारी सकाळी दहा वाजता तब्बल २३ तासांनी दर्शन झाले.

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या वेळी एकादशी दिवशी गर्दीमुळे हजारो भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांना विठुरायाचे आणि राही, रखुमाईचे दर्शन घेता यावे यासाठी रथयात्रेचा सोहळा काढण्याची परंपरा आहे.

त्यानुसार दुपारी माहेश्वरी धर्मशाळेपासून रथ यात्रा निघाली. प्रदक्षिणा रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण प्रदक्षिणा रस्त्यावरून फिरून रथ सायंकाळी माहेश्वरी धर्मशाळेजवळ आल्यावर सोहळ्याची सांगता झाली.

नगरप्रदक्षिणा व रथयात्रा उत्साहात

आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी बुधवारी उशिराने येथे पोचले. त्यामुळे आज एकादशी दिवशी भाविकांना स्नानासाठी नदी पात्रात पुरेसे पाणी होते.

सकाळपासून नगरप्रदक्षिणा करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होती. प्रदक्षिणा रस्त्यावरून दिंड्या, पताकांसह टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत वारकरी मोठ्या उत्साहाने नगरप्रदक्षिणा करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com