पंढरपूर - कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई.
पंढरपूर - कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई.

कार्तिकी वारीचा उद्या मुख्य सोहळा

सोलापूर - कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या राज्यभरातील पायी दिंड्या पंढरपूरनजीक आल्या असून, कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवारी (ता. ८) होत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास शासकीय महापूजा होणार आहे. पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढत असून, श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शदर्शनाची रांग बुधवारी घाटाच्याही पुढे गेली होती.

यंदा लांबलेल्या पावसामुळे कार्तिकी वारीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण, सध्या तरी वारकऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या यात्रांदरम्यान पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्यात कार्तिकीचे गणित हे सगळे पावसावर अवलंबून असते. मॉन्सूनोत्तर पावसामुळे चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढू लागली आहे. सध्या नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. यात्रेला आलेल्या भाविकांना मोकळेपणाने वावरता यावे, यासाठी घाटावरील सर्व स्टॉलचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. नदीचा प्रवाह वाढल्याने यात्रेदरम्यान सर्व होडीचालकांना आपल्या होड्या बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत (ता. ७) बहुतेक सर्व दिंड्यांचे आगमन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com