Kasba Bypoll Election : पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ची पोटनिवडणुकीसाठी तयारी; इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Kasba Bypoll Election :
Kasba Bypoll Election :

पुणे - पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. भाजपने दोन्ही मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच या निवडणुकीत आम आदमी पक्षाची एंट्री झाली आहे.

Kasba Bypoll Election :
Kasba Bypoll Election : भाजप-शिंदे गटात ताळमेळच लागेना! भाजपं करणार शक्तीप्रदर्शन अन् शिंदे म्हणतात…

दिल्लीनंतर पंजाब जिंकणारा आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवाय आपने पोटनिवडणुकीतून एंट्री करण्याचं निश्चित केलं आहे. वास्तविक आपने स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र आपकडून सध्या पोटनिवडणुकीसाठी देखील मुलाखती घेण्यात येत आहेत.

Kasba Bypoll Election :
Kasba Bypoll Election : बिनविरोध निवडणुकीसाठी शिंदेंचा फोन आला होता, पण...; पटोलेंची भूमिका

आपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आपचे प्रभारी गोपाळ इटालिया यासाठी आज पुण्यात आहेत. निवडणुकीसंदर्भातील आपचे प्रभारी इटालिया हे पुण्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com