Kerala Floods : केरळ राज्याला लोकप्रतिनीधी, नोकरशाही यांची मदत

Kerala Floods : केरळ राज्याला लोकप्रतिनीधी, नोकरशाही यांची मदत

मुंबई: मानवतेच्या दृष्ट्टीकोनातून मदतकार्यासाठी प्रतिसाद म्हणून, महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांनी कतर्व्यबुध्दीने राज्यातील अधिकाऱ्यांच्या ऑगस्ट 2018च्या पगारातून एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी परस्पर कापून घ्यावा, असा प्रस्ताव शासनाला कळवला आहे. तसेच सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनीही केरळ राज्याच्या आपत्तीसाठी त्यांच्या निवृत्तीवेतनातून एक दिवसाच्या वेतनाची रक्कम देण्याचे दूरध्वनीद्वारे सांगितले आहे.

केरळ राज्यातील आपत्तीचे भीषण स्वरुप पाहता, राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर राहतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिक रक्कम देता यावी यासाठी आता राज्याचे मा. मुख्यमांत्री, मा. मांत्री, मा. राज्यमंत्री, मा. विधानसभा सदस्य, मा. विधनपरिषद सदस्य, राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व अन्य अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतन इतकी रक्कम सप्टेंबर, 2018 च्या वेतनातून वसूल करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे. असा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

दरम्यान, केरळ राज्यात थैमान घालणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक लोक बेघर झाले आहेत. ही राष्ट्रीय आपत्ती असून त्यासाठी सर्व स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जिवित व वित्तहानी भरुन काढण्यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक पाठबळाची आवश्यकता लागणार आहे. राज्य शासनाकडूनही मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून मा. मत्री, जलसपदा व वैद्यकीय रशक्षण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टराचे पथक व औषध साहित्यासह मदतीसाठी तात्काळ केरळ राज्यात दाखल होवून मदतीचे कार्य केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com