
मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं आहे
भाजप नेत्याची CM ठाकरेंवर आक्रमक टीका; सुपरडुपर फ्लॉप सभा
शिवसेनेची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बाबरीच्या प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांना धारेवर धरलं. दरम्यान, आता यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तेच पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा ई-सभा घेतली असती तर सर्वांचे कष्ट तरी वाचले असते, असा टोमणा भाजपाचे केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. यांसदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व नकली, सोमय्यांचा हल्लाबोल
ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी सभेतून त्रागा व्यक्त केला. कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्यांपलीकडे त्यांचे भाषण पुढे गेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून स्वतःच्या हिंदुत्वाचं सत्व गमावल्यानंतर भाजपाच्या हिंदुत्वाला बोल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मात्र भाजपाचं हिंदुत्व किती प्रखर, प्रभावी आहे, हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे.
महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून भाजपावर निराधार आरोप केले. पण प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोईस्करपणे विसरले आहेत.
हेही वाचा: पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार - IMD
हात वर करत मुख्यमंत्र्यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे. मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं आहे. त्यात ना हिंदुत्वाचा हुंकार होता. ना विकासाची दिशा होती. ना स्वतःच्या शिवसैनिकांना संदेश होता. होती ती केवळ वैफल्यग्रस्तता, अगतिकता आणि त्रागा असंही उपाध्ये यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title: Keshav Upadhye Criticized To Cm Thackeray Super Flop Meeting Online Meeting Arranged
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..