खडसेंच्या तक्रारीवर कारवाईस तूर्त मनाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - पुण्यातील भोसरी येथील जमीनविक्री प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम मनाई केली. त्यामुळे खडसे अधिकच अडचणीत आले आहेत. 

खडसे यांनी एमआयडीसीतील जमीन गैरप्रकार करून निकटवर्तीयांच्या नावाने खरेदी केली, अशी तक्रार बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केली आहे. खडसे यांनीही गावंडे यांच्याविरोधात फौजदारी फिर्याद केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी गावंडे यांनी केलेल्या याचिकेवर आज न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पोलिसांनी तक्रारीच्या फायली या वेळी सादर केल्या. पुढील सुनावणी होईपर्यंत पोलिसांनी कठोर कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले. 

Web Title: Khadse complaints of prohibited action