
खामगाव : जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या गळतीला लगाम बसून ह्या शाळा स्पर्धेच्या युगात टिकाव्यात यासाठी खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द ग्रामपंचायतने एक स्तुत्य व अभिनव पाऊल उचलले आहे.