esakal | राज्यात खरिपाचा पेरा 74 टक्‍क्‍यांवर! गतवर्षीच्या तुलनेत नऊ टक्के कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

Kharip

राज्यात खरिपाचा पेरा 74 टक्‍क्‍यांवर! गतवर्षीच्या तुलनेत नऊ टक्के कमी

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

राज्यात यंदा खरिपाची पेरणी 74 टक्‍क्‍यांवर पोचली असली तरीही गतवर्षीच्या या कालावधीतील पेरणीच्या तुलनेत ती नऊ टक्‍क्‍यांनी कमी आहे.

माळीनगर (सोलापूर) : राज्यात यंदा खरिपाची पेरणी (Kharif sowing) 74 टक्‍क्‍यांवर पोचली असली तरीही गतवर्षीच्या या कालावधीतील पेरणीच्या तुलनेत ती नऊ टक्‍क्‍यांनी कमी आहे. सोयाबीनची पेरणी उरकत आली असून उडीद, कापूस, तूर या पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळून अनेक भागात दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी, उर्वरित पेरणी व पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता आहे. दरम्यान, नंदुरबार (Nandurbar) जिल्हा वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 241 तालुक्‍यांत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. (Kharif sowing in the state has declined by nine percent this year as compared to last year-ssd73)

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 141.98 लाख हेक्‍टर असून 12 जुलैअखेर 104.76 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (73.79 टक्के) खरिपाचा पेरा झाला आहे. राज्यात खरीप पिकांचे ऊस पिकासह सरासरी क्षेत्र 151.33 लाख हेक्‍टर असून 105.96 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (70 टक्के) पेरणी, लागवड झाली आहे. मागीलवर्षी या कालावधीत ऊस पीक वगळून 117.82 लाख हेक्‍टर (82.98 टक्के) क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अहवालातून ही बाब समोर आली आहे.

काही ठिकाणी पावसाअभावी रोपवाटिकेतील भात रोपे पिवळी पडण्यास सुरवात झाली होती. मात्र, पाऊस सुरू झाल्याने पीक परिस्थिती सुधारेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. पेरणीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत. पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत.

हेही वाचा: तिन्हीवेळा कर्जमाफीचा लाभार्थी, तरीही कर्ज मिळत नसल्याची तक्रार

12 जुलैपर्यंत राज्यातील सरासरी पाऊसमान 335.7 मिलिमीटर इतके आहे. यंदा 1 जूनपासून 12 जुलैपर्यंत 368 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 106.5 टक्के पाऊस झाला आहे. 355 तालुक्‍यांपैकी 241 तालुक्‍यात शंभर टक्केपेक्षा अधिक, 59 तालुक्‍यात 75 ते 100 टक्के, 37 तालुक्‍यात 50 ते 75 टक्के, 17 तालुक्‍यात 25 ते 50 टक्के तर एका तालुक्‍यात 0 ते 25 टक्के पाऊस झाला आहे.

पीकनिहाय पेरणीची स्थिती (हेक्‍टरमध्ये)

पीक : झालेली पेरणी : टक्केवारी

 • सोयाबीन : 3836132 : 99

 • उडीद : 327281 : 91

 • तूर : 1084965 : 85

 • कापूस : 3389395 : 81

 • भुईमूग : 149084 : 75

 • मका : 531506 : 63

 • मूग : 281885 : 58

 • बाजरी : 315819 : 47

 • खरीप ज्वारी : 156768 : 32.5

 • भात : 296279 : 20

 • रागी : 13472 : 14.2

हेही वाचा: "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट !' घालतोय धुमाकूळ

विभागनिहाय 12 जुलैपर्यंतची पेरणी (हेक्‍टरमध्ये)

 • विभाग : सरासरी क्षेत्र : प्रत्यक्ष पेरणी : टक्केवारी

 • कोकण : 441930 : 97981 : 22

 • नाशिक : 2119026 : 1125582 : 53

 • पुणे : 866819 : 641357 : 74

 • कोल्हापूर : 802979 : 672650 : 84

 • औरंगाबाद : 2022880 : 1751846 : 87

 • लातूर : 2794088 : 2428058 : 87

 • अमरावती : 3223984 : 2629152 : 82

 • नागपूर : 1925919 : 1129473 : 59

 • एकूण : 14197625 : 1129473 : 74

loading image