esakal | "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट !' घालतोय धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

"ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट !' घालतोय धुमाकूळ

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सध्या सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्याने तुफान धुमाकूळ घातला आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सोशल मीडिया (Social Media) हे आजच्या तरुणाईबरोबरच सर्वांच्याच जीवनातील एक अविभाज्य घटक झाला आहे. काही पुष्कळ नागरिक सोडले तर सर्रास सर्वजणच याचा वापर करतात. त्यात सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह असणाऱ्यांची काही कमी नाही. या सोशल मीडियावर कायम काहीतरी नवनवीन ट्रेंड येत असतात आणि तो तितकेच हिटही होतात. लॉकडाउन सुरू झाल्यापासून अनेक ट्रेंड, चॅलेंजेस फेसबुक (Facebook), व्हॉट्‌सऍपवर (Whatsapp) पाहायला मिळाले आहेत. सध्याही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामच्या (Instgram) स्टेटसवर "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्याने तुफान धुमाकूळ घातला आहे. (Singer Umesh Gawali's song is going viral on social media-ssd73)

हेही वाचा: पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना (Covid-19) या महामारीने धुमाकूळ घातला आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र दिवसेंदिवस नवनवीन ट्रेंड, व्हिडिओ मिम्स, चॅलेंजेसनी धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरचं जग हे मोठं व्यापक आहे. या मंचावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आपण कधी कल्पनाही केली नसेल असे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतात. या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर नेहमी धुमाकूळ उडालेला असतो. सध्या फेसबुक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर फक्त आणि फक्त "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरलेले हे गीत फोटो मिक्‍स व्हिडिओ एडिटिंग करून अनेकजण सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर शेअर करत आहेत.

या गीताच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवले जात आहे. एकंदरीत, सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर कोरोनाची कमी पण ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट'ने मात्र धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा: बार्शीच्या डॉ. कसपटेंना आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्‍टरेट बहाल !

याबाबत या गीताचे गायक उमेश गवळी म्हणाले की, सध्या इन्स्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जातात. तसेच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील "ओ शेठ' असं बोलून जातो. त्यातून हे गीत सुचले. यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिले. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, याचे आम्हाला नि:स्वार्थपणे लोकांपर्यंत पोचवत असलेल्या म्युझिकचे समाधान वाटत आहे.

अशाप्रकारे आहेत गीताचे बोल...

जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली

नावाला तुमच्या डिमांड आली

ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट

ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट...

loading image