खय्याम यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

Khayyam
Khayyam

मुंबई - ‘कभी कभी’, ‘उमराव जान’ यांसारख्या चित्रपटांना अजरामर संगीताचा अमूल्य ठेवा देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंधेरी येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्‍मी यांचे सोमवारी (ता. १९) जुहू येथील सुजॉय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात आला. काही मंडळींनी त्यांच्या घरी जाऊन, तर काहींनी दफनभूमीत येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यामध्ये अलका याज्ञिक, सोनू निगम, उत्तम सिंग, उदित नारायण, अशोक पंडित, अभिनेता रझा मुराद आदी कला क्षेत्रामधील मंडळींचा समावेश होता. सायंकाळी चारच्या सुमारास हा दफनविधी पार पडला. 

खय्याम यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात १९४७ मध्ये केली. त्यांना खरी ओळख मिळाली ती १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली. ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘फिर सुबह होगी’ अशा सुपरहिट चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘कभी कभी’ व ‘उमराव जान’ या दोन चित्रपटांसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९५३ ते १९९० या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com