esakal | खोपोली: वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू | Khopoli Accident
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

खोपोली: वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (mumbai-pune highway) दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन चालकांचा मृत्यू झाल्याची (two driver death) घटना बुधवारी सकाळी घडली. टेम्पो आणि एक ट्रक चालकाचा मृतांत समावेश आहे. अवजड वाहनाने अचानक वेग कमी केल्याने भरधाव टेम्पो त्याला धडकला. यात चालक रहेमान मनाल शेख (वय ४१) गंभीर जखमी (injured) झाला. तो वाहनाचे सुकाणू आणि आसनाच्यामध्ये अडकून पडल्याने त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: नवी मुंबई: कोविड योद्ध्यांच्या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

दुसरी घटना निशीसागर फूड मॉलजवळील ट्रक टर्मिनस येथे घडली. ट्रक विश्रांतीसाठी थांबलेल्या असताना चालक तुलसीकुमार दामोदरन (वय ४८, रा. तकलुपूर कर्नाटक) हा ट्रकच्या केबिनमध्ये मृतावस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूमागचे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top