खोतकर, दानवेंच्या 'कुस्ती'कडे राज्यभराचं लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

जालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली. खोतकरांच्या आगामी राजकारणाची जंगी तयारी सुरु असल्याची चर्चाही या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेकडून प्रबळ दावेदार असणारे खोतकर लोकसभेची लढत आणखी रंगतदार करणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केल्याचीही चर्चा आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मात्र, दानवेंना कोणत्याही परिस्थितीत चितपट करायचा चंगच खोतकरांनी बांधला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या लोकसभेच्या कुस्तीसाठी जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्ध्याला हरवायच आहे, असे खोतकरांनी ठरवले आहे. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या 'कुस्ती'कडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत.
 
Web Title: Khotkar and Raosaheb Danves Democracy Wrestling attention in State