"हे घ्या पुरावे..."; रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर सोमय्या ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya
"हे घ्या पुरावे..."; रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर सोमय्या ठाम

"हे घ्या पुरावे..."; रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर सोमय्या ठाम

किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. याबद्दल आपण तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही लवकरच कोर्लई गावात जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. तसंच सोमय्यांनी या गैरव्यवहाराबाबतचे काही कागदपत्र देखील समोर आणले आहेत. तसंच कोर्लईच्या (Korlai, Alibaug) सरपंचांनी केलेला दावा खोटा असून, आपल्याकडे त्याबद्दलचे पुरावे असल्याचं सोमय्या म्हणाले. तसंच कोर्लई गावाचे सरपंच काहीही बोलतात असं सोमय्या म्हणाले.

हेही वाचा: सोमय्यांवर टीका पण फडणवीसांवर विश्वास; पाहा राऊत काय म्हणाले?

हेही वाचा: 'बहुत याराना लगता है!'; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

अलिबागच्या बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे यांच्या नावे भरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हते तर, मालमत्ता कर का भरला, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. मला जोड्यांनी का मारणार, असं ते म्हणाले. यावमध्ये रश्मी ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित माहिती समोर आणली आहे. संबंधित बंगले असणाऱ्या ग्रामपंचायतींची रश्मी ठाकरेंनी माफी मागितल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: फडणवीस असं करणार नाहीत, एक दिवस लोक सोमय्यांची धींड काढतील - राऊत

किरीट सोमय्यांनी काही कागदपत्र सादर केले. ते म्हणाले की, प्राप्ती कर विभागाने २ संप्टेंबर २०२१ ला संपत्ती जप्त केली. ते पाहण्यासाठी मी सांताक्रुझला गेलो. त्याठिकाणी पाहणी केली आणि तक्रार केली. रश्मी ठाकरेंनी लिहीलेलं पत्र आहे. त्यामध्ये रश्मी लिहीलंय की, अन्वय मधूकर नाईक यांची जागा खरेदी केली असून, त्यामध्ये त्यांनी तसा उल्लेख केला आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर १९ बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिल्याचं ते यावेळी म्हणाले. कोर्लईच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जागा रश्मी ठाकरें, मनिषा रविंद्र वायकरच्या नावे करण्यासाठीचा प्रस्ताव पारीत करतात. त्यानंतर जुन २०१९ नंतर प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये सर्व १९ बंगले रश्मी ठाकरेंच्या नावे केले गेले असं सोमय्या म्हणाले. तसंच आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली सर्व पुरावे मिळाल्याचंही ते म्हणाले. तसंच आपली लढाई ही सरपंचांशी नसून, मुख्यमंत्र्यांशी असल्याचं ते म्हणाले आहे. राज्यातील काही माध्यमांनी काल कोर्लईच्या सरपंचांची मुलाखत घेतली, त्यावर टीका करत सोमय्यांनी आपण सर्व पुरावे दिले असल्याचं ते म्हणाले.

Web Title: Kirit Somaiya Allegations Rashmi Thackeray Uddhav Thackeray Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top