"CM ठाकरेंच्या आशीर्वादानं राऊतांच्या पार्टनरने केला कोट्यवधींचा धंदा"

किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Kirit Somaiya News Updates
Kirit Somaiya News Updatessakal

मुंबईत आज राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपने एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेना काही मोठे गौप्यस्फोट करणार आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या देखील आक्रमक झाले आहेत. कोरोना काळात कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांनी आज याबद्दल तक्रार दाखल झाली आहे.(kirit Somaiya Allegations on CM Thackeray)

Kirit Somaiya News Updates
'आँधी से कहो औकात में हे', ईडीची छापेमारी सुरू होताच राऊतांचं ट्वीट

संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकरने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने करोडो रुपयांचा धंदा केल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. पुणे महापालिकेने ब्लॅक लिस्ट केले, तरी त्यांना 13 कंत्राट दिले गेले. फौजदारी कारवाई करावी अशी आम्ही तक्रार दाखल केली. आझान मैदान पोलीस स्टेशनने 7 दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी अन्यथा आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशन विरोधात कोर्टात जाऊ असा इशालाही सोमय्यांनी दिला आहे.

Kirit Somaiya News Updates
शिवसेनेच्या रडारवर भाजपचे 'साडे तीन नेते'; 'ही' नावं चर्चेत

दरम्यान, दुसरीकडे मुंबईत केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीने मोठी कारवाई सुरू केली आहे. संपत्ती कराराबाबत ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com