'ठाकरे सरकारच्या ५ घोटाळेबाजांच्याविरोधात', किरीट सोमय्यांचे ट्विट चर्चेत|Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya Allegations on Thackeray Government

'ठाकरे सरकारच्या ५ घोटाळेबाजांच्याविरोधात', सोमय्यांचे ट्विट चर्चेत

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आरोप केले होते. आज त्यांनी एक ट्विट करून या आठवड्यात ठाकरे सरकारमधील ५ घोटाळेबाजांच्या विरोधात न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री ठाकरे भीतीपोटी अटक करा म्हणतात - किरीट सोमय्या

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री हसन मुश्रीफ, संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि अनिल परब यांची नावे आहेत. हसन मुश्रीफ सहकारी कारखान्यावरून किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. त्याविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर देखील सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेटविरोधात त्यांनी तक्रार नोंदविली होती. त्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात दोन प्रकरणांमध्ये किरीट सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. तसेच अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टबाबत दापोली न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विटमधून दिली आहे.

पेडणेकरांवर काय आरोप? -

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे 'किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी आहे. वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई हा या कंपनीचा पत्ता आहे. याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.

संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर काय आरोप? -

संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करत मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राटामध्ये घोटाळा केला. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले होते. याठिकाणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

Web Title: Kirit Somaiya Allegations Thackeray Government Hearing Against Five Corruption Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top