Kirit Somaiya I मुख्यमंत्री ठाकरे भीतीपोटी अटक करा म्हणतात - किरीट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

मुख्यमंत्री ठाकरे भीतीपोटी अटक करा म्हणतात - किरीट सोमय्या

शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या (Shivsena) नेत्यांनी म्हटलं आहे. सलग चार दिवस जाधवांच्या घरात छापेमारी सुरु आहे. यावेळी काही महत्वाचे दस्तऐवजही हाती लागले आहेत. दरम्यान, या काही मुद्यांवरून आता भाजपाचे (BJP) किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा: सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं - चंद्रकांत पाटील

ते म्हणतात, यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचे बक्षीस मातोश्री बांद्रा बंगल्याला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणे श्रीधर पाटणकरांची (Shridhar Patankar) पाच दिवसांपूर्वी कोट्यवधीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि तेजस ठाकरे यांचा एका कोमोस्टॉक कंपनीचा सात कोटी रुपयांचा मनी लॉंड्रींगचा व्यवहार बाहेर आणला आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंना भीती वाटतं आहे. म्हणून ते म्हणत आहेत की मलाही अटक करा, मी ही जेलमध्ये जायला तयार आहे. त्यामुळं तुम्ही घोटाळे केलं आहेत तर त्याची कारवाई होणारंच असंही सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, चौकशीदरम्यान यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली. त्यामध्ये जाधव यांनी दोन कोटी रुपये 'मातोश्री'ला दिल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये जाधव यांनी दोन कोटी रुपये 'मातोश्री'ला दिल्याचा उल्लेख आहे. मातोश्री या म्हणजे कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या आईला पैसे दिल्याचं सांगितलं. आईला दानधर्म करण्यासाठी पैसे दिल्याचा खुलासा आहे. यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा या मुद्द्यांवरून राजकीय वातावणर तापण्याचे संकेत दिसत आहेत.

हेही वाचा: 'संजय राऊत तुम्ही 'महाचमचा'; पंतप्रधानांची माफी मागावी'

Web Title: Kirit Somaiya Criticized On Cm Thackeray Arrested For Fear Of Ed Inquiry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top