Kirit Somaiya Sanjay Raut | राऊत- सोमय्या वाद चिघळला; मानहानीच्या खटल्यावर कोर्टात सुनावणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya Sanjay Raut
राऊत- सोमय्या वाद चिघळला; मानहानीच्या खटल्यावर कोर्टात सुनावणी होणार

राऊत- सोमय्या वाद चिघळला; मानहानीच्या खटल्यावर कोर्टात सुनावणी होणार

किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातलं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र आता शिगेला पोहोचलं आहे. दोघांमधला वाद चांगलाच चिघळला असून आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावरही संजय राऊतांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावरूनच सोमय्यांनी थेट कोर्टात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली आहे. (Kirit Somaiya with wife Medha filed an appeal in court against Sanjay Raut)

हेही वाचा: किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात जुंपली; पाहा व्हिडिओ

पत्नी मेधा सोमय्यांसह याचिका दाखल केल्यानंतर सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमय्या म्हणाले, संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप केले. त्याविरोधात आज आम्ही मानहानीकारक याचिका दाखल केली आहे. मेधा सोमय्या यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे. याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: किरीट सोमय्यांची सहकुटुंब पोलिसांत धाव; संजय राऊतांविरोधात तक्रार करणार

सोमय्या पुढे म्हणाले, "मला विश्वास आहे की, संजय राऊतांना समन्स जाणार. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आहेत. कारण भोंगा, आरडाओरडा संजय राऊत पण चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. काय झालं? चार महिन्यात काहीच सिद्ध झाले नाही. इतका तमाशा केल्यानंतर एक रुपयाचाही घोटाळा निघाला नाही. सजा भोंग्याला होणार उत्तर उद्धव ठाकरेंना मिळणार. आम्ही यावेळी यांना सोडणार नाही."

हेही वाचा: सोमय्या पाच दिवसांत जेलमध्ये जाणार ः संजय राऊत

सोमय्या पुढे म्हणाले, "शिवसेना नेते संजय राऊत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी मला बदनाम करण्यासाठी १०० कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप करीत आहेत, त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी." असा मानहाणीचा खटला मेधा सोमैया यांनी आज शिवडी, मुंबई कोर्टात दाखल केला आहे".

Web Title: Kirit Somaiya And His Wife Medha Filed An Appeal On Sanjay Raut Shivsena Mp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top