kirit somaiya: अनिल परबांनंतर सोमय्यांचं लक्ष अस्लम शेख यांच्या थिएटरकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

kirit somaiya: अनिल परबांनंतर सोमय्यांचं लक्ष अस्लम शेख यांच्या थिएटरकडे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी स्पष्ट केले.

किरीट सोमय्या वांद्रयात झालेल्या पाडकामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले असता त्यांना पोलिसांनी BKC जवळ अडवलं. सोमय्या यांच्या भूमिकेवर परब आक्रमक झाले होते.

त्यावर सोमय्या यांनी BKC पासून पत्रकारांशी संवाद सांधला यावेळी अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत ते म्हणाले हे कार्यालय ज्याने बांधलं तेव्हा या कार्यालयात विज कुठून येत होती. त्याला MRTP लागू करा.

अनिल परबांनी कार्यालय वाचवण्यासाठी प्रचंड खटाटोप केला मात्र ते म्हाडाने पाडलं, आता या नंतर माझं लक्ष राहिलेले रिसोर्ट आणि अस्लम शेख यांच्या थिएटरकडे वळवणार आहे.

पुढं म्हणाले आता तरी मराठी माणूस परबांना आठवला, ऐवढा भ्रष्टाचार केला त्यातून रिसोर्ट बांधली. वांद्रे येथील बांधकाम पाडलं, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार, रश्मी ठाकरे यांच्या बंगल्याची चौकशी सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते बंगले पाडले. त्यावेळी देखील हेच म्हणत होते की ते आमचे नाहीत. अनिल परब यांच्या प्रकरणातही त्यांनी लोकायुक्तांच्या सुनावणीच्या दोन वर्षापर्यंत हे बांधकाम पाडले नाही अखेर म्हाडाने ते पाडले.

टॅग्स :Kirit Somaiya