राष्ट्रवादी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यास तयार? 'या' नेत्याने घातली एक अट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळे गुरव येथील चंद्रभागा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
CHINCHWAD by ELECTION 2023
CHINCHWAD by ELECTION 2023esakal

CHINCHWAD by ELECTION 2023: चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीची रंगत वाढणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.

राष्ट्रवादीने या पोटनिवडणुकीत उमेदवाराची चाचपणी केली असून लवकरच या जागेसाठी उमेदवार जाहीर होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीने या जागेची जबाबदारी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

CHINCHWAD by ELECTION 2023
लक्ष्मण जगताप मृत्युशी झुंज देत होते, तेव्हाच भाजपने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळे गुरव येथील चंद्रभागा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी शेळके यांनी सांगितलं की, "भाजपने कमळ चिन्ह बाजूला ठेवून उमेदवार जाहीर करावा, आम्ही ही निवडणूक बिनविरोध करू भाजपच्या उमेदवाराला कोणतीही सहानुभूती मिळणार नाही.

CHINCHWAD by ELECTION 2023
प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत लढलो तर २०० पेक्षा जास्त जागा जिंकू

कारण भाजपची बूथ कमिटीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केला. मात्र अंतर्गत गटतट यांमुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली. मावळाची जनता माझ्या पाठीमागे उभी राहते, मग पिंपरी चिंचवड मधील जनता का राहत नाही.

विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडतो. संघटनात्मक काम केले पाहिजे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बुथ प्रमुख महत्त्वाचा घटक आहे.

सोबत शिवसेना, काँग्रेस, वंचित असेल. पण आपण मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपला अजेंडा लोकांमध्ये पोहोचवला पाहिजे. मतभेद, गैरसमज बाजूला ठेवा.असा सल्ला शेळके यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com