
धमकावल तरी सोमय्या थांबणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा राऊतांसह सेनेला टोला
मुंबई : किरीट सोमय्या हे कोर्लई गावात जायला निघालेत अशी बातमी कळताच संजय राऊत यांचा थयथयाट सुरु झाला आहे. सोमय्यांना रोखण्यासाठी राऊत पत्रकारांसमोर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात 'कर नाही त्याला डर कशाला?' तुम्ही कितीही धमकावल तरी सोमय्या हे थांबणार नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज शुक्रवार (ता.१८) संजय राऊतांसह (Sanjay Raut) शिवसेनेला लगावला आहे. ते पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कोर्लई गावात असं कोणतं रहस्य दडलयं, जे लपविण्यासाठी राऊतांची एवढी धडपड सुरु आहे? सोमय्या कोर्लई गावात गेल्यास त्यांना धडा शिकवू वगैरेची भाषा कोणतं गुपित लपवण्यासाठी वापरली जात आहे? राऊतांच्या अशा थयथयाटावरुन 'दाल मे कुछ काला है, हे नक्की! , असे पाटील म्हणाले.(Kirit Somaiya Continue His Campaign, Says Chandrakant Patil)
हेही वाचा: वक्फ जमीन घोटाळ्यात आष्टीतील बडे मासे; नायब तहसीलदार, मंडळाधिकाऱ्याला अटक
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचे १९ बंगल्यांची पाहणीसाठी सोमय्या आज कार्लई गावात गेले होते. या प्रकरणावरुन शिवसेना (Shiv Sena) व भाजप आमने-सामने उभे आहेत.
Web Title: Kirit Somaiya Continue His Campaign Says Chandrakant Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..