esakal | किरीट सोमय्या पुन्हा बोलले, '...ही ठाकरे सरकारची बनवाबनवी'
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-1.jpg

भाजपचे नेते किरीट सेमय्या यांनी आरे कारशेडच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही तर ठाकरे सरकारची बनवाबनवी आहे. जे उपाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेच उपाय ठाकरे सरकारने केले आहेत. सत्ता हातातून गेल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. 

किरीट सोमय्या पुन्हा बोलले, '...ही ठाकरे सरकारची बनवाबनवी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपचे नेते किरीट सेमय्या यांनी आरे कारशेडच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही तर ठाकरे सरकारची बनवाबनवी आहे. जे उपाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तेच उपाय ठाकरे सरकारने केले आहेत. सत्ता हातातून गेल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक निर्णयांना कात्रजचा घाट दाखविला आहे. त्यापैकी पहिल्या कॅबिनेटनंतर झालेल्या दुसर्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन त्यांनी त्याबाबत एक समिती गठीत केली. तसेच पर्यावरणाची हानी न करता आम्ही महाराष्ट्राचा विकास करू असे सांगितले. तसेच कुठल्याही विकासकामांबाबत तडजोड न करता सुरू ठेवू असे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

माझी लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस : पवार

आरे कारशेडच्या निर्णयावरून भाजप नेते सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ''ठाकरे सरकार आरे कारशेडबाबत बनवाबनवी करत आहे. जे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेच ठाकरे सरकार करत आहे. जी समिती स्थापन केली आहे, ती धूळफेक करणारी आहे.
ही समिती जे करणार आहे ते सर्व फडणवीस सरकारने केले होतं
तसे कोर्टाने देखील मान्य केलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार जनतेला फसवत आहे.''  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप ​