अनिल परब फक्त टाईमपास करताहेत, 4 तास चर्चा करत होते की, ...; सोमय्यांचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

दादागिरी व वसुलीचे धंदे करणाऱ्या तिघाडी सरकारला घरी बसवू - सोमय्या

अनिल परब फक्त टाईमपास करताहेत, 4 तास चर्चा करत होते की, ...

रत्नागिरी : परिवहनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, शरद पवार आणि ठाकरेंनी एसटीची वाट लावली. चार तास चर्चा करत होते की पत्ते खेळत होते. कर्मचारी निलंबित केले, कर्मचारी हजर झाले, पहिली एसटी सुटली अशा बातम्या देत होते. परब फक्त टाईमपास करत आहेत. हा संप म्हणजे क्रांती आहे. एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आघाडी सरकारला सोडणार नाही. दादागिरी व वसुलीचे धंदे करणाऱ्या तिघाडी सरकारला घरी बसवू. या सरकारचे तेरावे घालू, पण अजून काही दिवस आहेत, असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिला.

माळनाका येथे एसटी विभागीय कार्यालयाच्या बाहेर काम बंद आंदोलन एसटी कर्मचारी करत आहेत. आज सोमय्या रत्नागिरी दौऱ्यावर आले असता दुपारी कामगारांमध्ये सामील होत भाषण दिले. त्या वेळी ते बोलत होते. शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे आणि कामगारांवर अन्याय करू नका, असेही सोमय्या यांनी सांगितले.

हेही वाचा: परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई, ४ जण ताब्यात

या वेळी सोमय्या म्हणाले की, गेले पंधरा दिवस कामगार आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार दोन हजार कर्मचाऱ्यांना काढले, नवीन भरती केली, पहिली एसटी बस सुटली असे खोटे सांगत आहे. कामगारांच्या जीवाशी खेळतात त्यांना सोडणार नाही. महामंडळाने कामगार युनियनशी करार केले. एवढे टक्के वाढले म्हणून मिठाई वाटली. मग का एसटी चालत नाही. संप सुटला, कामगार कामावर आले असे परब खोटे सांगताहेत. कामगारांना न्याय देण्याचे काम करा. मी महाराष्ट्रभर फिरतोय. मागण्या मान्य कराव्याच लागणार कारण दुनिया झुकती झुकानेवाला चाहिये.

सोमय्या यांनी पुढे सांगितले, आझाद मैदान, ठाणे, कल्याण, औरंगाबाद आदी सर्व ठिकाणी मी कामगारांना भेटलो. कामगार रस्त्यावर उतरले आहेत. झोपतात पण तिथेच. परवा तेरावा दिवस होता म्हणजे आंदोलनाचा. कधीतरी या सरकारचे तेरावे करावे लागणार आहे. एसटी कामगार घरी जात नाही. साम, दाम, दंड, भेद करूनही एसटी कामगार मागे हटणार नाही. आझाद मैदानावर गेलो तिथे एक ताई आंदोलनात होत्या. ऑक्टोबरमध्ये त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. लोक आता मागे हटणार नाहीत. तुमच्या या लढ्यात पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे. नक्की न्याय मिळणार आहे.

हेही वाचा: '...तर काँग्रेसचे 25 आमदार संध्याकाळपर्यंत आपमध्ये येतील'; केजरीवालांचा छातीठोक दावा

हे वसुली सरकार

सत्तेसाठी एकत्र आलेले तिघाडी सरकार आहे. वसुलीसाठी अड्डे निर्माण केले आहेत. तिघांनी अड्डे वाटून घेतले आहे. पालकमंत्री परब कोविडच्या काळात रिसॉर्ट बांधत होते. त्यांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत असाल तर... असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मी कोणाला घाबरत नाही, तसेच एसटी कामगारपण घाबरत नाही. आम्ही रस्त्यावरच आहोत. सत्याला कोणी वाकवू शकत नाही. इथे सत्य व संघर्ष आहे, असेही किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले.

loading image
go to top