महाविकास आघाडी अन् रझा अकादमीच्या नेत्यांना अटक का केली नाही? सोमय्यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

जमावाने पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

'महाविकास आघाडी अन् रझा अकादमीच्या नेत्यांना अटक का केली नाही?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यातील काही शहरात तोडफोडीच्या घटना घडत आहेत. याचे पडसाद राज्यातील अमरावती जिल्ह्यात दिसले. त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्याने मालेगाव, नांदेड, अमरावतीत मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला या दंगली प्रकरणी सवाल केला आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती

ट्विट करत त्यांनी, महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली आहे. ते म्हणतात, व्होट बँक आणि तुष्टीकरणसाठी मस्जिदचा नावाने खोटी माहिती देणे, लोकांना भडकवणे आणि उग्र भाषणं करणाऱ्या महाआघाडी आणि रझा अकादमीचा नेत्यांना ठाकरे पवार सरकारने अजूनपर्यंत अटक का केली नाही? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: 26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर

दरम्यान, अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शहरात कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आज भाजपच्या वतीने अमरावती ग्रामीण भागात बंदची हाक दिली आहे. सध्या ग्रामीणमध्ये पोलिस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी रझा अकादमी असेल किंवा आणखी कोणी असेल त्यांच्यासंदर्भात चौकशी केली जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितले आहे.

loading image
go to top