'प्रताप सरनाईकांसह, सहकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा'

याप्रकरणी दोघांवरही फौजदारी दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
'प्रताप सरनाईकांसह, सहकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा'
Summary

याप्रकरणी दोघांवरही फौजदारी दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi sarkar) अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावा करत आहेत. या मद्द्यांवरून वारंवार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावेही सादर केले आहेत. आता पुन्हा एकदा याप्रकरणी ते चर्चेत आले आहेत. दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) मंत्रालयात जाऊन फाईल बघितल्याने खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाल्याने आता शिवसेनेचे (Shivsena MLA) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर सोमय्यांनी निशाणा साधला आहे.

यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात, २४ जानेवारला नगर विकास विभागात माहिती (मी मंत्रालयात फाइल्सची तपासणी करत असताना) घेत असताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकाऱ्यांसह अनधिकृट फोटो काढले आहेत. त्यांनी ते सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. ते फोटो व्हायरल झाल्याने गोपनियतेचा आणि 'झेड' सुरक्षेचा ('Z' Security) खेळ झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी दोघांवरही फौजदारी दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

'प्रताप सरनाईकांसह, सहकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा'
किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रातील 'आयटम गर्ल' - नवाब मलिक
'प्रताप सरनाईकांसह, सहकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा'
किरीट सोमय्या मंत्रालयात; कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स बघितल्याने खळबळ

दरम्यान, सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाले होते. किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल यावेळी उपस्थित झाला होता. आता त्यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा विरोधक सत्ताधारी यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com