Kirit Somaiya निघाले कोर्लईला; स्थानिक शिवसैनिक आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiriti Somaiya, Korlai
सोमय्या निघाले कोर्लईला; स्थानिक शिवसैनिक आक्रमक

किरीट सोमय्या निघाले कोर्लईला; स्थानिक शिवसैनिक 'स्वागता'ला तयार

राज्यात मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अलीबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे १९ बंगल्यांसंदर्भात सोमय्यांनी केलेला आरोप काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी थेट आज कोर्लईत (korlai, Alibag) जाऊन बंगल्यांची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार आज ८ वाजता सोमय्या कोर्लईला निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामुळे आजही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (kirit Somaiya Visits Korlai)

हेही वाचा: ठाकरेंशी चर्चेनंतर काँग्रेसचे समाधान; पुरेसा निधी देण्याचे आश्‍वासन

अलीबागच्या कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याबद्दल आपण तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी आज आपण कोर्लई गावात जाणार असल्याचं काल सोमय्यांनी सांगितलं. सकाळी आठ वाजता मुंबईतून अलिबागच्या दिशेने निघणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमय्या भेट देणार असल्याचं समजतंय.

हेही वाचा: शिवसेना तुमच्यापासून अंतर का राखतेय, हिशोब लावून आम्हालाही कळवा - चंद्रकांत पाटील

कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर कोर्लई गावाच्या सरपंचांनी हे आरोप फेटाळून लावले होते. असे कोणतेही बंगले नसून, छोटी घरं असल्याचं ते म्हणाले होते. तसंच रश्मी ठाकरेंनी या घरांचा भरल्याचं त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. यावेळी कोर्लई गावाच्या सरपंचांनी केलेल आरोप खोटे असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. एवढंच नाही तर किरीट सोमय्या कोर्लई गावात येत असल्याने शिवसैनिक देखील आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा: 'राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू', ठाकरे म्हणाले...

Web Title: Kirit Somaiya Korlai Alibag Rashmi Thackeray Bungalow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top