किरीट सोमय्यांनी हल्ला प्रकरणी घेतली राज्यपालांची भेट

पुण्यातील घटनेसंदर्भात राज्यपालांनी चिंता व्यक्त केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSakal
Updated on

मुंबई : पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन देत, या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याची देखील विनंती केली आहे. दरम्यान, पुण्यात घडलेल्या घटनेसंदर्भात राज्यपालांनी चिंता व्यक्त केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच गुरूवारी आपण दिल्लीला जावून गृहसचिवांची भेट घेणार असून येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. (Kirit Somaiya Meet Governor Bhagat Singh Koshyari)

सोमय्या म्हणाले की, हल्ला करणारे 64 जण होते. हे सर्व जण व्हिडिओमध्ये दिसत असून या सगळ्यांना अटक झाली पाहिजे असे सांगत, हल्लेखोरांना अटक न झाल्यास पुण्यात आंदोलन करणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे राज्य सरकारचे ऐकतात असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Kirit Somaiya
Google Chromeचा नवा लोगो पाहिला का? 8 वर्षांनी झाला बदल

सोमय्या हल्ला प्रकरण : शिवसैनिकांना जामीन मंजूर

किरीट सोमय्या हल्ल्या प्रकरणात अटकेतील शिवसैनिकांना जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून, 3000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महापालिकेत हल्ला करण्यात आला होता. (Kirit Somaiya Attack Latest News In Marathi) भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी आरोपी असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राज्य सचिव किरण साळी यांच्यासह अन्य चारजण आज शिवाजीनगरच्या पोलीस ठाण्यात हजर झाले. आधीही पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली होती. (Kirit Somaiya Attacked by Shivsena in PMC)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com