kirit Somaiya I राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर... सोमय्यांची बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit

'तुम्ही आता हिरवे झालाय, भगवा रंग अन् हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करणार'

'राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर...'

जागतिक व्यंगचित्र दिवसाच्या शुभेच्छा देत आज खासदार संजय राऊत यांनी मनसेला टोमणा दिला आहे. (Sanjay raut on Raj Thackeray) ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांसारखी व्यंगचित्रकलेची क्षमता होती, असं आम्हाला वाटायचं, त्यांनी ते सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला. यावर आता भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भोंगा आहे. या भोंग्यात हिम्मत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन एफिडेविट फाईल करावे, असा इशारा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिला आहे. पहाटे पाच वाजता वाजणारे भोंगे उतरवले हे या भोंग्याला कळत नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे. तुम्ही पूर्ण हिरवे झाले आहात, त्यामुळे भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण आता आम्ही करणार आहोत, असंही म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा: 'सेनेशी संबंध असलेल्या अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा सन्मान वाढला का?'

ते म्हणाले, तुम्ही पूर्ण हिरवे झाले आहात, त्यामुळे भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण आता आम्ही करणार आहोत, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त मशिदीवरील भोंगे उतरवायचे काम नाही. तुम्ही तर गणेशोत्सवामध्ये हे भोगे उतरवले होते. भाजपाने खूप मोठी जबाबदारी मला दिली आहे. मला महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आहे. जनेतेने हे काम मला दिला आहे आणि ते मी करत आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका करत ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा सात कोटींचा ट्रांजेक्शन समोर आलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या 15 कंपन्यांसोबत ट्रांजेक्शन केलं आहे. त्यामुळे आता हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्यात समोर येतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Web Title: Kirit Somaiya Reaction To Uddhav Thackeray And Sanjay Raut File Affidavit In Supreme Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top