CM ठाकरेंकडून चहावाल्याला 100 कोटींचे कंत्राट; सोमय्या थेट हॉटेलात

ज्या चहावाल्याला कंत्राट दिल्याचा आरोप केला, त्याच्या हॉटेलला सोमय्यांनी भेट दिली.
kirit somaiya Udhhav Thackeray
kirit somaiya Udhhav Thackerayesakal

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह्याद्री रेस्टोरेंटच्या मालकाला 100 कोटींचे कंत्राट दिला आणि त्यांचा थेट संबंध संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. संजय राऊत यांचे बेनामी पार्टनर सुजित पाटकर याला हे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला. तीन पेशंटचे मृत्यू झाल्यानंतर त्याला ब्लॅकलीस्ट करण्यात आलं मात्र तरी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांना नंतर पुन्हा कंत्राट दिलं. त्यानंतर आता आज किरीट सोमय्या आज त्याच चहावाल्याकडे गेले असल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी सह्याद्री रेस्टोरेंटचे मालक राजीव साळुंकेवर गंभीर आरोप केले.

kirit somaiya Udhhav Thackeray
मलिकांना झटका! राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा वानखेडेंना दिलासा

किरीट सोमय्या यांनी मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधीत काही लोकांवर त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्यांचे राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनाही ईडीने ताब्यात घेतलं आहे, त्यानंतर आता सोमय्यांनी त्यांच्या मोर्चा कोविड सेंटरकडे वळवला असून, कोरोना काळात मोठे गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुंबईच्या वरळी येथील सह्याद्री रस्टोरेंटच्या मालकाला कोरोना काळात मोठे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी आता केला आहे. आज त्यांनी अचानक सह्याद्री रेस्टोरेंटला भेट दिली. मात्र यावेळी रेस्टोरेंटचे मालक त्याठिकाणी उपस्थित नसल्याचं दिसून आलं.

kirit somaiya Udhhav Thackeray
वीज कर्मचाऱ्यांचा २८, २९ मार्चला संपाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com