murder
murder sakal

वडिलांनी मारलं म्हणून १३ वर्षाच्या मुलानं चिमुकलीचा घेतला जीव

पोलिसांना त्या चिमुरडीचा मृतदेह शाळेच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहे.
Summary

पोलिसांना त्या चिमुरडीचा मृतदेह शाळेच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहे.

लखनऊच्या सैरपूर पोलिस स्टेशन परिसरात एक वर्षाच्या लहानगीचा खून करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. संबंधित मुलाला वडिलांनी मारले होते. त्या अपमानाचा बदला म्हणून त्याने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

तपासा दरम्यान, पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह शाळेच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहे. मुलीचा मृतदेह वर येऊ नये म्हणून आरोपीने त्या मृतदेहाला पायाला वीट बांधली होती. मिळालेली माहिती अशी की, सैरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जुगौर गावात सुशील पांडे यांची एक वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पांडे यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला.

murder
नवऱ्याच्या मृत्यूनंतर झाला छळ; मुलीसाठी 36 वर्षे 'पुरुष' म्हणून काढली

यानंतर दोन अल्पवयीन मुलांनी या मुलीला शाळेत नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस तात्काळ शाळेत दाखल झाले आणि शोधमोहिम सुरु केली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह वर येऊ नये म्हणून तिच्या पायाल वीट बांधण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह त्या टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.

यानंतर याप्रकरणाचा तपास केला असता उलगडा झाला. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने या मुलीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मारणारा मुलगा ड्रग्सचा व्यसनी असून तो अनेकदा लोकांना त्रास देत असल्याचेही पोलिसांनी सांगितेल आहे. वडिलांनी कानाखाली मारली असल्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीची हत्या केली असल्याचे प्राथमदर्शी चौकशीतून समोर आले आहे.

murder
Viral Video: महिला वकिलला लाथा-बुक्क्यांनी जबरी मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com