सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; मुश्रीफांच्या कारखान्याला भेटणार?

hasan mushrif
hasan mushrife sakal

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टचाराचे आरोप करून राज्यभर खळबळ उडवून दिलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवारी (ता. २०) कोल्हापुरात (Kolhapur) येणार आहेत. त्यादिवशी ते मुश्रीफ यांनी उभारलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वृत्ताला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही दुजारो दिला आहे. ते म्हणाले, ‘‘देशात कोणालाही कोठेही जायचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने एखाद्याला अडवण्याचा अधिकारही लोकशाहीने दिलेला आहे. सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत, हे नक्की आहे.’’

दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले आहेत. त्याला त्याचदिवशी मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर जिल्हाभर सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्ह्यातील लकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महाविकास आघाडीनेही श्री. सोमय्या यांच्या निषेधाचे पत्रक दिले.

या पार्श्‍वभूमीवर सोमय्या सोमवारी (ता. २०) कोल्हापुरात येत असल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाली. त्याची खात्री पाटील यांच्याकडे केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला. सोमय्या यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत पोलीस यंत्रणेकडे मात्र अजून कसलीही माहिती आलेली नाही.

Summary

घोरपडे कारखान्याला देणार भेट; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही दुजोरा

पोलिसांवर ताण

गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर आहे. रविवारी (ता. १९) अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असतील, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोमय्या कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत असलेला असतोष आणि त्याच होत होणारा दौरा यामुळे पोलिस दलावर ताण पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com