
मुख्यमंत्री खरे असल्याचं ग्रामपंचायत स्पष्ट करू शकली नाही - सोमय्या
राज्यात मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अलीबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे १९ बंगल्यांसंदर्भात सोमय्यांनी केलेला आरोप काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी थेट आज कोर्लईत (korlai, Alibag) जाऊन बंगल्यांची पाहणी करणार आहेत. त्यानुसार आज ८ वाजता सोमय्या कोर्लईला निघाले. ते कोर्लईत दुपारी दीड वाजता पोहोचले.
कोर्लईत बोलताना सोमय्या यांनी म्हटलं की, कोर्लइ ग्रामपंचायतीत आमची व्यवस्थित भेट झाली. मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही. ग्राम पंचायत ही उद्धव ठाकरेंचं प्रतिनिधीत्व करतात. ग्रामसेवकांना पेपर दिले त्यांना सांगितले की याआधी बोलणं झालंय, बंगले होते, आता काय परिस्थिती आहे ते दोन दिवसात कळवतो असं सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या पत्नी मिसेस मुख्यमंत्री सांगतात की माझे बंगले आहेत. मग खरं कोण आहे. भेटीगाठी व्यवस्थित झाल्या. ग्रामसेवकांशी भेट झाल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
भाजपला कोर्लई गावात केवळ शक्ती प्रदर्शन करायचे होते असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच सोमय्या यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केलेली नाही, असे सरपंच आणि ग्रामसेवकांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी सरपंच कार्यालयात जाऊन ग्रामसेवकाची भेट घेत बाहेर पडले आहेत. यानंतर ते आता रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची भेट घेणार आहेत.
सोमय्या सरपंचांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेले आहेत. तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे कार्यालयाच्या बाहेरच रोखून धरले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यामुळे येथे काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सोमय्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते कोर्लईत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सोमय्या दाखल होताच जोरदार घोषणाबाजी केली. किरीट सोमय्या यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफासुद्धा आहे.
हेही वाचा: 'बहुत याराना लगता है!'; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ
हेही वाचा: उद्योगपती आत्महत्या करण्यापूर्वी सोमय्यांना भेटले, राऊतांचा आरोप
पती उद्धव ठाकरेनी पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी १९ बंगले विकत घेतले. आज जर शिवसेनेचा गद्दार सरपंच म्हणतो बंगले नाहीत. बंगले गायब झाले की, नाही याची चौकशी व्हायला पाहिजे. हे बंगले गेले कुठे? मी मोदींना विनंती करणार रश्मी उद्धव ठाकरे यांचे बंगले शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करायला हवी असं सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, सोमय्यांनी स्वत: बेनामी मालमत्ता जमवली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हा भूताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भूताटकीने झपाटलंय. मी याआधीही सांगितलं आहे, सोमय्या आरोप करत असलेले बंगले त्या ठिकाणी नाहीत. संबंधित जागेवर कोणतंही बांधकाम नाही, असं त्यांनी म्हटलं.
Web Title: Kirit Somaiya Visit Korlai Rashmi Thackeray Sanjay Raut Shivsena Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..