किरीट सोमय्या म्हणाले, खरं म्हणजे आता कारवाई सुरू झाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

किरीट सोमय्या म्हणाले, खरं म्हणजे आता कारवाई सुरू झाली

शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली. मागील चार दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. खरं म्हणजे आता कारवाई सुरू झाली. मिडल असेचमध्ये त्यांच्या दोन कंपन्या असल्याची माहिती आहे. ही कारवाई संपली नाही उलट आता तर कारवाई करेल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

छापेमारी सुरू असताना यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही १८ ऑगस्ट २०२१ रोजी आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार दाखल केली होती, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. शुक्रवारी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. सोमवारी सलग चौथ्या दिवशीही कारवाई झाली. तसेच त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरीही छापा टाकला आहे. खरं म्हणजे आता कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई अजून संपलेली नाही. महिनाभरात तपासाला अजून वेग येईल, असेही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

हेही वाचा: Ukraine : वरुण गांधींचा घरचा अहेर; सरकारला करून दिली आठवण

१५ दिवसानंतर कारवाई होईल

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास १३ कोटी ४१ लाख रुपये इतकी असल्याचे समजते. आज फक्त कागद मिळाले आहे. याची पाहणी करण्यासाठी १५ दिवस जातील. १५ दिवसानंतर कारवाई होईल, असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करा

नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. गृहमंत्र्यालयाने मला पाठवलेल्या पत्राप्रमाणे त्या दिवशी मंत्रालयात प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी फोटो काढले आणि अपलोड केले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

Web Title: Kirit Somaiya Yashwant Jadhav Shiv Sena Prajakt Tanpure Pratap Sarnaik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top