Bandatatya Karadkar : बंडातात्या कराडकरांना पक्षाघाताचा झटका! उपचारासाठी पुण्यात हलवणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandatatya Karadkar

Bandatatya Karadkar : बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका!

सातारा : किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका आला आहे. साताऱ्यातील फलटण येथील निकोप रूग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे पण पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Paralysis attack of Kirtankar Bandatatya Karadkar)

बंडातात्या कराडकर हे वारकरी समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या ठोस भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते. राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात.

किर्तनकार आणि वारकरी सांप्रदायातील बंडातात्या कराडकर हे काल फलटणमध्ये होते. यावेळी त्यांना त्रास झाला त्यामुळे त्यांना निकोप रूग्णालयात दाखल करण्यात आले.

डाक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पक्षघाताचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. बंडातात्या कराडकर हे ७० वर्षाचे आहेत. 

हेही वाचा: Nana Patole : काँग्रेसच्या भूमिकेने सत्यजीत तांबेंचा मार्ग खडतर; पटोले म्हणाले, पाठिंबा...

बंडातात्या कराडकर यांना पुढच्या आवश्यक उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून बंडातात्या कराडकर हे चर्चेत असणारे नाव आहे. सरकारच्या वाईन धोरणावर टीका तसेच कोरोना काळात पायी वारी करण्याची घोषणा, या प्रकरणामुळे बंडातात्या चर्चेत होते. 

हेही वाचा: MPSC Students Protest: पेपर पॅटर्नबद्दल विद्यार्थी आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात

टॅग्स :Maharashtra NewsSatara