Satyajeet Tambe : काँग्रेसच्या भूमिकेने सत्यजीत तांबेंचा मार्ग खडतर; पटोले म्हणाले, पाठिंबा...

Nana Patole
Nana Patole

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी विद्यमान सुधीर तांबे यांनी माघार घेऊन ए.बी. फॉर्म अभावी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे. (Graduates Constituency Election news in Marathi)

Nana Patole
CM Shinde : सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

सत्यजीत तांबे यांच्याबाबत संपूर्ण माहिती, हायकमांडला दिली आहे. हायकमांडकडून आज निर्देश येतील. त्याप्रमाणे कारवाई होईल. मात्र बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

पक्षाकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती.मात्र तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरवून भाजपचा पाठिंबा मिळवणार असल्याचं म्हटलं. हे काँग्रेसशी दगबाजी आहे. हायकमांडने सांगितल्यानंतर पाठिंबा देण्यात येईल, असंही पटोले यांनी नमूद केलं.

Nana Patole
Maharashtra Politics : "आज भाच्याने सगळ्यांना 'मामा'बनवलं"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

बाळासाहेब थोरात आणि माझा काही संपर्क झाला नाही. भाजप सध्या घरं तोडण्याचा आनंद घेत आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल, तेव्हा त्यांना कळेल. त्यावर काही बोलायच नाही. पण पुढील कारवाई हायकमांडच्या निर्देशानंतर होईल, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

सत्यजीत तांबे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट झाल्याने सत्यजीत यांचा मार्ग खडतर झाला आहे. मात्र त्याचवेळी सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Nana Patole
Delhi High Court : सशस्त्र पोलीस दलाच्या जुन्या पेन्शन करण्याबाबत HCचा मोठा निर्णय; आता...

दरम्यान सत्यजीत तांबे यांनी आपण अजुनही काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. शिवाय आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून सर्वांच्या भेटी घेणार असल्याचं नमूद केलं होतं. तसेच भाजपच्या नेत्यांना देखील विनंती करणार असल्याचं नमूद केलं होतं. तेव्हापासून सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.

यावेळी नाना पटोले यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com