
'केंद्रात कायदे बनवणाऱ्या खासदारांकडूनच नियमांचं उल्लंघन होतंय'
पेडणेकरांनी राणांना फटकारलं, म्हणाल्या वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्या...
खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील MRI मधील व्हायरल फोटो प्रकरणी आज शिवसेनेच्या नेत्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. रुग्णालय प्रशासन आणि खासदार राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
त्या म्हणाल्या, 14-15 दिवसानंतर झालेल्या मनोमिलनाचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले त्याला आमचा विरोध नाही. पण, केंद्रात कायदे बनवणाऱ्या खासदारांकडूनच नियमांचं उल्लंघन होत आहे. वयाच्या 12 व्या वर्षांपासून त्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जेवण नाही मिळालं तरीही त्या प्रसिद्धीसाठीही त्यांचा प्रयत्न असतो. पण तुमच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असं म्हणत त्यांनी खासदार राणा यांना फटकारलं आहे.
हेही वाचा: BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात
दरम्यान, खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) एमआरआय प्रक्रियेदरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डने लीलावती हॉस्पिटलला नोटीस बजावली होती. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर रुग्णालयाला उत्तर द्यावे अशी मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन एमआरआय प्रक्रियेतून जात असलेले खासदार नवनीत राणा यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कसे का व्हायरल झाले, असा सवाल व्यवस्थापनाला केला होता.
काय म्हणाले लीलावती रुग्णालयाचे सीईओ?
लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी लेफ्टनंट जनरल डॉ रविशंकर यांनी सोमवारी सांगितले की, आम्हाला रविवारी बीएमसीकडून नोटीस मिळाली आणि उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. निवेदने गोळा करून समिती स्थापन करत आहोत. आम्ही निर्धारित वेळेपूर्वी उत्तर देऊ. ते म्हणाले, कसलटंट (डॉक्टर) नसताना एमआरआय रात्री 10 वाजता करण्यात आला. ही प्रतिमा तंत्रज्ञांनी सल्लागाराला पाठवली होती.
हेही वाचा: कृपाशंकर यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती
Web Title: Kishori Pednekar Criticized Navneet Rana Mir Photo Viral Scoil Media Lilavati Hospital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..