सुभाष देसाई : शिवसेना आमदार ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार. 

- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री.

-  2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच विधान परिषदेवर.

मुंबई : महाराष्ट्रात आज महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या प्रत्येकी दोन आमदारांची कॅबिनेटपदी निवड निश्चित झाली आहे. त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाचा समावेश आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्त्व करत आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

तसेच मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्याच काळात मुंबईच्या पालकमंत्रिपदीही त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. आता त्यांची पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदी निवड होणार आहे. 

सुभाष देसाई यांचा राजकीय प्रवास :

- जन्म 12 जुलै 1942 रत्नागिरी जिल्हयात झाला.

- 1966- शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सहभाग

- मुंबईत गोरेगाव येथे गोरेगाव धर्मादाय संस्था माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन

- अमेरिका, जर्मनी, जपान आदी देशांचे दौरे केले.

- मेक इन इंडिया मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन

- इंडिया मॅन्युफॅक्‍चरिंग अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला.

1990 मध्ये पहिल्यांदा आमदार. 

- 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी.

- 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते

- 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड

- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री.

- 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच विधान परिषदेवर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know more about Shivsena Leader Subhash Desai