esakal | अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

महाविकासआघाडीच्या शपथविधीपूर्वी नॉट रिचेबल झाल्याने अजित पवार नाराज असल्याचे सुरु झाले होते. ते नेमके कुठे गेले असे प्रश्न उपस्थित होत होते. पण, आता सुप्रिया सुळेंनीच स्पष्ट केले आहे. सध्या आम्ही असलेल्या ठिकाणी रेंज नाही आणि आम्ही एकत्र सहाच्या सुमारास शपथविधीला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत गेल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची अफवा आज (गुरुवार) सकाळी पुन्हा एकदा अफवा पसरली. पण, वेळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आम्ही एकत्र असल्याचे सांगितले आणि रेंजमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ते नाराज नसल्याचेही म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीच्या शपथविधीपूर्वी नॉट रिचेबल झाल्याने अजित पवार नाराज असल्याचे सुरु झाले होते. ते नेमके कुठे गेले असे प्रश्न उपस्थित होत होते. पण, आता सुप्रिया सुळेंनीच स्पष्ट केले आहे. सध्या आम्ही असलेल्या ठिकाणी रेंज नाही आणि आम्ही एकत्र सहाच्या सुमारास शपथविधीला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, ते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतले होते. आज होणाऱ्या शपथविधीवेळी त्यांना शपथ देण्यात येणार नाही हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने त्या पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांना हे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. परंतु, पक्षाविरुद्ध बंड केल्याने त्यांच्याविरुद्ध काहीसा नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले मत जयंत पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

loading image
go to top