कोकण रेल्वेचा 32 वा स्थापना दिन साजरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेचा 32 वा स्थापना दिन साजरा!

कोकण रेल्वे महामंडळाचा 32 वा वर्धापन दिन शनिवारी नवी मुंबई येथील कोकण रेल्वे विहारमध्ये साजरा करण्यात आला.

कोकण रेल्वेचा 32 वा स्थापना दिन साजरा!

मुंबई - कोकण रेल्वे महामंडळाचा 32 वा वर्धापन दिन शनिवारी (ता. 15) नवी मुंबई येथील कोकण रेल्वे विहारमध्ये साजरा करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या स्थापनादिनी उत्कृष्ट काम केलेल्या रेल्वे अधिकारी आणि रेल्वे कर्मचार्‍यांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच कोकण रेल्वेचा प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे कौतुक केले आणि त्यांना त्याच भावनेने काम करत राहण्याचे आवाहन केले.

यादरम्यान गुप्ता यांनी कोकण रेल्वेच्या विविध कामगिरीचीही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. ज्यामध्ये रोहा - वीर विभागाचे ट्रॅक दुहेरीकरण ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाले. 10 नवीन स्थानकांपैकी शेवटचे स्टेशन मार्च 2022 मध्ये कार्यान्वित करण्यात आले. मार्च 2022 मध्ये कोकण रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढला असून प्रदूषणाला आळा बसलेला आहे. कोकण रेल्वे नेहमीच प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत आहे. कोकण रेल्वे आपल्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.