

Kokan Weather Update
esakal
Maharashtra Cold Wave News : सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही वर्षांतील नीचांकी ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आज मुळदे संशोधन केंद्रावर झाली. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडीसदृश वातावरण आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिक बेजार झाले असून नागरिकांनी उबदार वस्त्रे बाहेर काढली आहेत. दुसरीकडे आंबा, काजू बागायतदारांसाठी ही थंडी सुखद धक्का मानला जात आहे.