Bank Election: आघाडीत बिघाडी;विरोधकांच्या बॅनरवर यड्रावकर, माने ; उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Patil Yadravkar,Dhairyasheel Mane

Bank: विरोधकांच्या बॅनरवर यड्रावकर, माने ; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार

कोल्‍हापूर : जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election)महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध सर्व, असे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी खूपच आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शिवसेनेतील फूटदेखील यानिमित्त स्‍पष्‍ट झाली आहे. शिवसेनेकडून मंत्री असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar)व खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane)या सत्तारूढ आघाडीकडून उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. असे असताना शिवसेनेने तयार केलेल्या प्रचाराच्या बॅनरवर मात्र मंत्री यड्रावकर व खासदार माने यांचे फोटे असल्याने मतदारांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. (Kolhapur District Bank Election)

जिल्‍हा बँकेची निवडणूक ऐनवेळी दुरंगी झाली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र काम करणारे काँग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना यांच्यात फाटाफूट झाली आहे. शिवसेना विरुद्ध सर्व अशी स्‍थिती आहे. काँग्रेस, राष्‍ट्रवादी सोबत भाजप आल्याने राज्यात एक नवीनच पॅटर्न पाहायला मिळत आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना विरोधात असली तरी त्यांच्यातही एकी राहिलेली नाही. शिवसेनेचे मंत्री यड्रावकर हे सत्ताधाऱ्यांसोबत कायम आहेत. तसेच खासदार माने यांच्या मातोश्री यांनीही सत्ताधारी आघाडीतून उमेदवारी घेताना शिवसेनेच्या विरोधात राहण्याची भूमिका घेतली आहे. या सर्वांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन चांगलीच आगपाखड केली आहे.

शिवसेनेत पदे घेऊन सेनेलाच विरोध करणाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याची भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे नेते अडचणीत आले आहेत.

केवळ बॅनरवर एकी

जिल्‍हा बँकेच्या मैदानात शिवसेनेतील फूट जगजाहीर असली तरी बॅनरवर मात्र एकी दिसत आहे. शिवसेनेने जिल्‍हा बँक निवडणुकीच्या प्रचारासाठी बॅनर तयार केले आहे. या बॅनरवर शिवसेनेच्या सर्व नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात मंत्री यड्रावकर व खासदार माने यांचाही समावेश आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे नेते यावर काय वक्‍तव्य करतात, याकडे लक्ष आहे.

Web Title: Kolhapur Bank Election Rajendra Patil Yadravkar Nivedita Mane Dhairyasheel Mane Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top