
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात संभाजीराजेंना रोखलं; फोनवरच अधिकाऱ्यांना झापलं!
खासदारकीचा कार्यकाळ संपल्याने संभाजीराजे छत्रपती आता कोणती नवी राजकीय भूमिका घेणार, याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र त्यातच आता आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ते कारवाईची मागणी करत आहेत.
हेही वाचा: ठरलं! संभाजीराजे 12 मे ला पुढील राजकीय भूमिका करणार स्पष्ट
याबाबत संभाजीराजेंचा अपमान झाल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला आहे. त्यांनी मंदिर व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानंतर तात्काळ संभाजीराजे छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा: संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार?
संभाजीराजे भोसले काल तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तिथे त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. व्यवस्थापनाने नियम सांगत हा प्रवेश नाकारला. त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. तसंच बोंबमारो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
मंदिर प्रशासनाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत एक पत्रकही जारी केलं आहे.
Web Title: Kolhapur King Sambhajiraje Chhatrapati Stopped In Tuljabhavani Temple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..